पुणे – मोबाइल ही आजच्या काळातली जीवनावश्यक गोष्टच झाली आहे. त्याचा वापर इतका प्रचंड आहे की, त्यासाठी आपल्याला फास्ट चार्जिंगची गरज असते. म्हणूनच बहुधा अलीकडे मोबाइल कंपन्या फास्ट चार्जरची देखील जाहिरात करतात. पण आपल्या मोबाईलला फास्ट चार्जर सपोर्ट करतो की नाही हे अनेकांना माहीतच नसते. त्यांच्यासाठीच आम्ही ही माहिती देत आहोत.
आपल्या फोनचे स्पेसिफिकेशन चेक करा
तुमचा फोन फास्ट चार्जिंगल सपोर्ट करतो की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन फोनचे स्पेसिफिकेशन चेक करू शकता. याशिवाय फोनचा बॉक्स आणि युझर मॅन्युअलमध्येही याची माहिती असते.
चार्जिंग करताना मेसेजवर लक्ष ठेवा
तुम्ही फोन चार्जिंगला लावता तेंव्हा लॉक स्क्रीनवर फास्ट चार्जिंग, चार्जिंग रॅपिडली किंवा सुपर चार्जिंग असे लिहिलेले दिसते. असा मेसेज येत असेल तर तुमचा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा आहे.
गुगल प्ले स्टोअरही देईल माहिती
गुगल प्ले स्टोअरही तुम्हाला याची माहिती देईल. यासाठी Ampere आणि AccuBattery हे ऍप डाउनलोड करू शकता. या ऍप्समुळे तुम्हाला फोन फास्ट चार्ज होतो की नाही हे समजेल.
एवढे सगळं केल्यावर जर तुम्हाला समजलं की तुमचा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत नाही, तर चिंता करायचं काहीच कारण नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी काही खास उपाय घेऊन आलो आहोत. जे केल्याने तुमचा फोन आहे त्या परिस्थितीत फास्ट चार्ज होईल.
चार्जिंग करताना मोबाइलचा फ्लाईट मोड ऑन करा, आणि चार्ज करा. यामुळे तुमचा फोन लवकर चार्ज होईल.
मोबाइल नेहेमी ओरिजिनल चार्जरने चार्ज करा. यामुळे बॅटरी लवकर चार्ज होते, आणि त्यावर फार ताणही येत नाही.