मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत आता जवळपास सर्वच जण स्मार्टफोन हाताळतात. किंबहुना स्मार्टफोनची एवढी सवय झाली आहे की घराबाहेर पडताना सर्वप्रथम आपल्या हातात मोबाईल असतोच. एखादवेळी आपण मोबाईल घरी विसरलो तर आपल्याला असे वाटते जणू आपले एक शारीरीक अंगच आपण बाजूला ठेवले आहे. अशा पद्धतीने आपल्या अत्यंत जवळ असणाऱ्या या स्मार्टफोनचा कॅमेरा हा डाव्या बाजूलाच का असतो, उजव्या बाजूला का नसतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आज त्याचेच उत्तर आपण शोधणार आहोत.
स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे अपडेट येत असतात. स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईलमुळे अनेक कामे घरी बसून केली जातात. सोबत मनोरंजन केले जाते. जर तुमच्याकडे सुद्धा स्मार्टफोन असेल तर तुम्ही एक गोष्ट नक्कीच पाहिली असेल की, स्मार्टफोनचा कॅमेरा हा नेहमी डाव्या बाजूलाच असतो. परंतु तो कॅमेरा डाव्या बाजूलाच का असतो, असा प्रश्न अनेकांना पडत असेल. सुरुवातीला जे स्मार्टफोन येत असत त्या स्मार्टफोनमध्ये कॅमेरे हे मध्यभागी असायचे परंतु हळूहळू फोनचा कॅमेरा लेफ्ट साइडला गेले. याची सर्वात आधी सुरुवात आयफोनपासून सुरू करण्यात आली. आयफोनचे जास्तीत जास्त फोनमधील कॅमेरे हे लेफ्ट साइडला देणे सुरू केले.
कॅमेराला डाव्या बाजूला ठेवण्यामागे मोबाईलची डिझाइन नव्हे तर एक वेगळेच कारण आहे. जास्तीत जास्त लोक हे डाव्या हाताने फोनचा वापर करत असतात. त्यामुळे लेफ्ट साइडला लावलेल्या कॅमेरातून फोटो किंवा व्हिडीओ शूट करणे सोपे जाते. तसेच कॅमेराला फिरवून लँडस्केप करतो. त्यामुळे मोबाईल कॅमेरा वरच्या बाजूला जातो. त्यामुळे हे सोपे जाते. लँडस्केप फोटो घेऊ शकता. यामुळे मोबाईल लेफ्ट साइडला असतात.
ज्यावेळी आपण फ्रंट कॅमेरामधून सेल्फी घेतो. त्यावेळी सेल्फी उलटा येतो. म्हणजेच त्या पोझिशन लेफ्ट टू राइट किंवा राइट टू लेफ्ट होते. त्यामुळे तुम्हाला सेल्फीत जे नाव दिसते ते उलटे दिसते. जास्तीत जास्त मोबाईलमध्ये ही अडचण असते. कारण, जास्तीत जास्त मोबाईलमध्ये सेल्फी कॅमेरात मिरर इफेक्ट असतो. त्यामुळे सेल्फी घेताना कॅमेरात व्यवस्थित दिसतो. परंतु, फोटो घेतल्यानंतर सेल्फीतील अक्षरे उलटी दिसतात.
ज्यावेळी स्मार्टफोन बाजारात दाखल झाले त्यावेळी कॅमेरे हे मध्यभागी होते. परंतु नंतर हळूहळू हे कॅमेरे मोबाइलच्या डाव्या बाजूला येऊ लागले. त्याची सुरुवात प्रथम आयफोनने केली होती. यानंतर बहुतांश कंपन्यांनी बाजूला कॅमेरे देण्यास सुरुवात केली. कॅमेरा डाव्या बाजूला असण्यामागचं कारण मोबाईलचं डिझाईन नसून आणखी काही कारण आहे. बहुतेक लोक डाव्या हाताने मोबाईल वापरतात. अशा स्थितीत डाव्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्याने फोटो किंवा व्हिडीओ शूट करणे सोपे जाते.
आपण कॅमेरा फिरवून लँडस्केप करतो, तेव्हा मोबाईलचा कॅमेरा वरच्या दिशेने येतो, ज्यामुळे आपण सहजपणे लँडस्केप फोटो घेऊ शकतो. तसेच जेव्हा आपण फ्रंट कॅमेरासह सेल्फी घेतो तेव्हा तो उलटा येतो. म्हणजेच, त्याची स्थिती डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे होते. अशा परिस्थितीत, असे होते की आपल्या सेल्फीमध्ये लिहिलेले नाव उलट होते किंवा दिसते. बहुतेक मोबाईलमध्ये ही समस्या असते. वास्तविक मोबाईलमधील सेल्फी कॅमेरामध्ये मिरर इफेक्ट असतो. याच कारणामुळे जेव्हा कोणी सेल्फी घेतो तेव्हा तो कॅमेऱ्यात सरळ दिसतो, पण फोटो काढल्यानंतर उलटा होतो.