नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जाहीर केली आहे. नोंदणीकृत मोबाइल नंबर अचूक आणि अद्ययावत राखण्याच्या महत्त्वावर या सूचनेत भर देण्यात आला आहे. आजच्या डिजिटल युगात शासकीय आणि बिगर- शासकीय सेवा, अनुदान, निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती यासारख्या इतर अनेक सुविधा मिळवण्यासाठी आधार नंबर हा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे आधारकार्डाशी संबंधित माहितीची अचूकता सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आधार द्वारे मिळणाऱ्या ऑनलाइन सेवांचे जग खुले करण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबर गुरूकिल्ली म्हणून काम करतो. शासकीय आणि बिगर- शासकीय सेवा, अनुदानाचा लाभ, निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती, सामाजिक लाभ, बँकिंग, विमा, कर आकारणी, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सेवा यासह इतर सेवांच्या विस्तृत श्रेणीची उपलब्धता सक्षम करण्यासाठी हे आवश्यक आहे. या सेवांचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वैध आणि अद्ययावत मोबाइल नंबर आवश्यक आहे.
आधारसाठी नोंदणी करताना वापरकर्त्याचा मोबाईल नंबर आधीच नोंदणीकृत केलेला नसेल, तर त्याची नोंदणी करण्यासाठी कायमवी स्वरूपी नावनोंदणी केंद्राला भेट देणे गरजेचे आहे. एकदा नोंदणीकृत झाल्यानंतर, मोबाइल नंबर अनेक महत्त्वाच्या सेवांमधील दुवा म्हणून काम करत करतो.
विवाह, स्थलांतर किंवा वैयक्तिक तपशिलांमध्ये बदल यासारखे बदल आधार माहितीमध्ये अद्यतनीत करणे आवश्यक आहे. या बदलांमध्ये नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल पत्ता आणि इतर काही बदल समाविष्ट असू शकतात. सेवा वितरणातील व्यत्यय टाळण्यासाठी आणि आधार प्रोफाइलची अखंडता राखण्यासाठी अचूक लोकसंख्याशास्त्रीय माहितीची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
आधार कार्डावरील लोकसंख्याशास्त्रीय माहिती अद्यतनीत करणे आवश्यक असून अधिकृत UIDAI पोर्टलद्वारे ही प्रक्रिया सहजपणे करता येते. नावनोंदणी प्रक्रियेतील चुका दुरुस्त करणे किंवा इतर आवश्यक बदल करणे असो, UIDAI पोर्टल ही अद्यतने सुलभ करण्यासाठी वापरकर्ता-अनुकूल इंटरफेस प्रदान करते.
विस्तृत श्रेणीमधील सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक असेल तेंव्हा त्यांच्या लोकसंख्याशास्त्रीय माहितीची पडताळणी आणि माहिती अद्ययावत करावी असे आव्हान युआयडीएआयच्या वतीने करण्यात येत आहे.
adhar update
Mobile Aadhar Card Link UIDAI Updation