नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे मनविसेच्या संघटनात्मक बांधणीकरीता ‘महासंपर्क यात्रा’ करीत आहेत. ही यात्रा आता ४ दिवसांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा हा भरगच्च दौरा असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मनविसेचे अध्यक्ष झाल्यानंतर अमित ठाकरे यांचा हा पहिलाच नाशिक दौरा आहे. राज्यातील बदलणाऱ्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक शहर व जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मनविसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये या दौऱ्याबाबत प्रचंड उत्साह दिसून येत आहे. असा आहे त्यांचा संपूर्ण दौरा कार्यक्रम
शनिवार, दिनांक ०६.०८.२०२२ –
सकाळी ०९.३० मुंबईहून इगतपुरी येथे आगमन,
सकाळी ०९.३०-११.३० इगतपुरी तालुका मेळावा, हॉटेल ग्रॅण्ड परिवार, टाके घोटी, इगतपुरी.
(सकाळी ११.३० वाजता सिन्नरकडे प्रस्थान)
दुपारी १२.३० – ०१.३० सिन्नर तालुका मेळावा, सिन्नर सार्वजनिक वाचनालय, छ. शिवाजी चौक, सिन्नर.
दुपारी ०१.३० ते ०३.०० – राखीव (जेवण व भेटीगाठी)
(दुपारी ०३.०० वाजता देवळालीकडे प्रस्थान)
दुपारी ०४.०० वाजता – सिन्नर फाटा येथे सत्कार.
दुपारी ०४.३०-०५.३० नाशिक तालुका मेळावा – डॉ. सुभाष गुजर सांस्कृतिक हॉल, देवळाली कँप.
(सायंकाळी ०५.३० वाजता नाशिककडे प्रस्थान)
रविवार, दिनांक ०७.०८.२०२२ –
सकाळी ०८.३० वाजता निफाडकडे प्रस्थान
सकाळी ०९.३०-११.०० निफाड तालुका मेळावा, रुद्रा बँक्वेट हॉल, निफाड हायवे.
(सकाळी ११.०० वाजता येवल्याकडे प्रस्थान)
दुपारी १२.०० – ०१.०० येवला तालुका मेळावा, डॉ. राजेश पटेल स्कुल, मनमाड रोड, येवला.
(दुपारी ०१.०० वाजता मनमाडकडे प्रस्थान)
दुपारी ०१.३० ते ०३.०० – मनमाड/नांदगाव मेळावा, श्रीलीला इंटरनेशनल हॉटेल हॉल, एफ.सी.आय. रोड, मनमाड.
दुपारी ०३.०० – ०४.०० राखीव (जेवण व भेटीगाठी) (दुपारी ०४.०० वाजता चांदवडकडे प्रस्थान)
दुपारी ०४.३०-०५.०० चांदवड तालुका मेळावा – NDCC होल, चांदवड.
(सायंकाळी ०५.०० वाजता मालेगावकडे प्रस्थान)
सायंकाळी ०६.००-०८.०० मालेगाव तालुका मेळावा, सोनार समाज हॉल, ज्योती नगर, मालेगाव.
(सायंकाळी ०८.०० वाजता नाशिककडे प्रस्थान)
सोमवार, दिनांक ०८.०८.२०२२
सकाळी ०८.०० वाजता सटाणाकडे प्रस्थान.
सकाळी ०९.३० वाजता – देवळा येथे सत्कार. कंदील चौक चौफुली, देवळा.
सकाळी १०.००-११.३० सटाणा तालुका मेळावा, राधाई हॉल, सटाणा रोड.
(सकाळी ११.३० वाजता कळवणकडे प्रस्थान)
दुपारी १२.३० – ०१.३० कळवण तालुका मेळावा,
दुपारी ०१.३० ते ०३.०० राखीव (वनभोजन) (दुपारी ०३.०० वाजता दिंडोरीकडे प्रस्थान)
दुपारी ०४.००-०५.०० दिंडोरी तालुका मेळावा, पोपटराव जाधव संकुल, बस स्टॅण्ड मागे, दिंडोरी.
(सायंकाळी ०५.०० वाजता पेठकडे प्रस्थान)
सायंकाळी ०६.३०-०७.३० पेठ तालुका मेळावा, शासकीय विश्राम गृह, पेठ.
(सायंकाळी ०७.३० वाजता नाशिककडे प्रस्थान)
मंगळवार, दिनांक ०९.०८.२०२२
सकाळी ०८.०० वाजता शहर समन्वयक श्री. सचिन भोसले यांच्या निवासस्थानी भेट.
सकाळी ०९.००-१०.३० पूर्व नाशिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद.
सकाळी १०.३०-दुपारी १२.०० पश्चिम नाशिक (सिडको, सातपूर), महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद.
दुपारी १२.००-०१.३० मध्य नाशिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद.
दुपारी ०२.०० मुंबईकडे प्रस्थान
MNVS Amit Thackeray Nashik Tour Mahasampark Yatra