ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेत नाशिकचे मनसे नेते सलिम शेख यांनी जोरदार भाषण केले. गेल्या काही दिवसांपासून शेख हे चर्चेत आले होते. मशिदींवरील भोंगे उतरविण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्याचे समर्थन शेख यांनी केले होते. त्यानंतर काही मुस्लिम बांधवांनी शेख यांच्यावर टीका केली होती. आज या संपूर्ण प्रश्नावर शेख यांनी उत्तर सभेत भाषण केले.
सलिम शेख म्हणाले की,
– माझे नेते हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही. राज्यात मात्र वेगळेच चित्र रंगवले जाते आहे.
– ज्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे मागे घ्यावेत. पुन्हा सक्रीय व्हावे
– जातपात किंवा धर्म न मानता केवळ जनतेसाठी आपल्याला काम करायचे आहे.
– माझा डीएनए काय आहे हे असे विचारण्यात आले
– माझी भूमिका स्पष्ट आहे, माझ्या डीएनएमध्ये मोहम्मद पैगंबर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत