मुंबई – ‘आदिपुरुष’ या सिनेमाला सर्वत्र विरोध होत असतांना या सिनेमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भात दोन ट्विट केले आहे. त्यात त्यांनी ओम राऊत यांच्याकडून अभ्यासपूर्ण मांडणी केल्याचा दावा केला आहे. ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट ॲंड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे. ओम राऊत याच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचीती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे. असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/1578227571908493312?s=20&t=3K-YGKAdIHq2zjz84XhqIw
https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/1578227571908493312?s=20&t=3K-YGKAdIHq2zjz84XhqIw
https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/1578227809138270208?s=20&t=3K-YGKAdIHq2zjz84XhqIw