नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनंता सुर्यवंशी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. मितभाषी आणि सहृदय व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वांना परिचित होते. नाशिक महानगरपालिकेत पंचवटी प्रभागातून त्यांनी नगरसेवक म्हणून देखील काम केलं. सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर होते. त्यांच्या निधनाने सूर्यवंशी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, सुर्यवंशी यांचे निधन ही मनाला चटका लावणारी आणि अतिशय दुःखद घटना आहे. त्यांच्याशी आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते,अगदी आमच्या संकट काळात सुद्धा ते आमच्या सोबत होते. मी व माझे कुटुंबीय सुर्यवंशी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, असे भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.