नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दोन दिवसीय नाशिक दौऱ्यात पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच, नाशिकमध्ये पक्षबांधणी पूर्ण झाली आहे का, आता पुढचे नियोजन काय आहे यासह विविध बाबींवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अमित ठाकरे म्हणाले की, विद्यार्थी सेनेच्या नियुक्त्यांसाठी आलो आहे. दीडशे पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलण्यापेक्षा मी इकडे आलो. तसेही नाशिकला यायला मला आवडतं. नाशिकला येण्यासाठी मी खरं तर कारणंच शोधत असतो. सगळ्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवण्याऐवजी मीच नाशिकला आलो. नाशिकमध्ये उत्साह असतोच. मी मागच्या दौऱ्यात सगळीकडे फिरलो. सगळ्यांना विद्यार्थी सेनेते काम करण्याची इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारले असता ते म्हणाले की, निवडणूक लागणार कधी ते मला सांगा, मग आपण त्याबद्दल बोलू. कधी ऐकले की एप्रिल, कधी सप्टेंबर, नक्की कधी होणार. तुम्हाला कळालं की मला सांगा मग त्यावर आपण बोलू. आता निवडणुकीची तयारी वगैरे नाही, तर पक्ष बांधणीसाठी हा दौरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे अनेकांचा कल आहे याबद्दल ते म्हणाले की, पक्षात लोक येत जात असतात. आमच्याकडे भाजपाच्या १५० जणांनी मुंबईत प्रवेश केलाय. राजकारणात हे होत असतं. लोक जात असले तरी आमच्याकडे रिप्लेसमेंट रेडी आहे. राज साहेबांना मानणारा एवढा मोठा वर्ग आहे की, एखाद दोन गेले तर काही फरक पडत नाही. एक एक माणसाला ओढून त्यांना काय मिळतंय मला माहित नाही, पण आम्हाला त्याचा फरक पडत नाही. शिंदे आणि ठाकरेंमध्ये चांगले संबंध असतानाही आपल्याकडे देखील लोक येत आहेत ना. मनसेची पहिली फेज नक्की परत येणार, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
नाशिकच्या पक्ष संघटनाबाबत ठाकरे म्हणाले की, जानेवारीत मी परत येणार आहे. नाशिकची टीम तयार झाली आहे. कॉलेज लेव्हलला युनिट स्थापन करायचे आहेत. तेच आता पुढचे टार्गेट आहे. त्याच्या तयारीला लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
MNS Leader Amit Thackeray Nashik Visit Target
Politics MNVS