इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकोल्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकरचा मृत्यूचे कारण पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आले. या रिपोर्टमध्ये मालोकारला जबर मारहाण केल्यामुळे मृत्य झाल्याचे रिपोर्टमध्ये आढळले आहे.
दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या विधानावर मिटकरींनी टीका केल्यामुळे अकोल्यात मनसेने मिटकरींची गाडी फोडली. त्यावेळी मनसे समर्थक आणि वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण जय मालोकार बाजूला उभा होता. तोडफोडीच्या काही वेळेतच मालोकारचा अटॅकमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलो होते. पण, पोस्टमार्टेममध्ये खरे कारण आता पुढे आले आहे.
पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये जय मालोकारच्या पाठीवर, छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाली. छातीच्या चार ते पाच बरगड्या फ्रॅक्चर होत्या. डोक्यालाही गंभीर इजा आणि मेंदूला सूज होती. मानेवरच्या मज्जातंतूना गंभीर दुखापतही झाली होती.