मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज मेळाव्यात जोरदार फटकेबाजी केली. राज यांनी आज विविध मुद्द्यांना आणि प्रश्नांना थेट हात घातला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांवर ते गरजले. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे असे
– शरद पवार यांच्यामुळेच देशात जातीपातीचे राजकारण आले आणि आता ते फोफावले आहे
– राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच दुसऱ्या जातीचा द्वेष करायला लावला
– मुंबईत आमदारांना फुटक घरे कशाला हवी आहेत. त्याऐवजी पोलिसांना घरे द्या. शिवाय आमदार आणि खासदारांची पेन्शन बंद करा
– कुठल्याही प्रार्थनेला माझा विरोध नव्हता आणि नाही. मशिदीवर लागलेले भोंगे आधी खाली घ्या. राज्य सरकार हा निर्णय का घेत नाही. हा निर्णय घेतला नाही तर त्याच मशिदीसमोर हनुमान चालिसाचे स्पीकर लावा. मी खरा धर्माभिमानी आहे.
– जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडाल तरच हिंदुत्वाचा ध्वज तुम्हाला हाती घेता येईल (मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता टीका)
– बाबासाहेब पुरंदरे यांनाही जातीवरुन टार्गेट करण्यात आलं.
– विधानसभा निवडणूक निकालानंतर पहाटे उठून पाहिले तर जोडा वेगळाच होता आणि प्रत्यक्षात पळून कुणाबरोबर गेले, कुणाबरोबर लग्न केले, हे काहीच कळत नाही असे राज हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून म्हणाले
– राज्यातील तीन नंबरचा पक्ष हा एक नंबर आणि दोन नंबरला फिरवतोय
– महाराष्ट्रातच काय पण देशाच्या राजकारणातही असा भलता प्रयोग कधी पाहिला नाबी
– एकमेकाला दुषणे देता आणि पुन्हा मांडीला मांडी लावून बसता. काय चाललंय हे
– विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेला साक्षात्कार झाला की अडीच-अडीच वर्षे ठरलं होतं. आमच्याशी, महाराष्ट्राशी किंवा सभेतही याबाबत कधी बोलला नाहीत
– पंतप्रधानांच्या सभेतही तुम्ही (उद्धव) होता. पंतप्रधान आणि अमित शहा म्हणाले की, भाजपचा मुख्यमंत्री होईल तेव्हा काहीही म्हणाला नाहीत
– निकाल लागताच घोडं अडवलं. आपल्याशिवाय सरकार होणार नाही. म्हणे, मी अमित शहांशी एकांतात बोलले. मग, बाहेर का बोलला नाहीत. मुख्यमंत्रीपदाचे चार भिंतीतच का बोलले. आणि शहा तर म्हणतात असं काही बोलणंच झालं नाही