मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत आज मनसैनिकांना नवे आदेश दिले आहेत. त्यामुळे या विषयाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. भोंग्याविरुद्धच्या लढ्याच्या पुढच्या टप्प्याची राज यांनी घोषणा केल्याचे सांगितले जात आहे. राज यांनी पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. हे पत्र परिसरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केली आहे.
पत्रात राज म्हणतात की,
मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्याच्याच नव्हे तर देशाचे राजकारण ढवळून निघाले. आता हा विषय कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.
तुम्ही एकच करायचं आहे – माझं पत्र तुम्ही राहात्या परिसरातील घराघरात स्वत: नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही.
मला खात्री आहे; जा्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/vCoubS5Aix
— Raj Thackeray (@RajThackeray) June 2, 2022