मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांची औरंगाबादमध्ये काल सभा पार पडल्यानंतर आज त्यांनी उद्याच्या ईदबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मनसैनिकांना एक आदेश दिले आहेत. राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरविण्याबाबत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मे चा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आता उद्या ईद साजरी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राज यांनी आज एक महत्त्वाचे ट्विट केले आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन. तूर्त एवढेच.
https://twitter.com/RajThackeray/status/1521062255722659841?s=20&t=HJ08QoUbJFW1gBylXYjc2w