मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा अचानक स्थगित केला आहे. याचे कारण राज हे येत्या २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत स्पष्ट करणार आहेत. मात्र, या दौऱ्याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विरोधकांना यामुळे आयते कोलीत मिळाले आहे. तर, उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराने राज यांना धमकी दिल्याने हा दौरा रद्द झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, खरे कारण काय आहे याबाबत विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे
(वरील व्हिडिओतील मताशी इंडिया दर्पण सहमतच असेल असे नाही)