मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता संघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. या निकालामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी अर्धी लढाई जिंकली असल्याचे बोलले जात आहे. तसेच, या निर्णयामुळे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. यासंदर्भात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांचं सरकार पुन्हा आणता आलं असतं, अशी टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. त्यासंदर्भात विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीने सावध असलंच पाहिजे. तेवढं भान त्यांना हवे, असे म्हणत राज यांनी उद्धव यांना टोला लगावला आहे.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1656920750517805057?s=20
माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की,” न्यायालयाचा निकाल विधिमंडळाच्या गटाला पक्ष म्हणून मान्यता देत नाही… मग निवडणूक आयोगाने त्या गटाला दिलेलं पक्षाचं नाव आणि चिन्ह ह्याचं काय..? अशा अनेक अस्पष्ट बाबी या निकालात आहेत ज्याची अजून स्पष्टता यायला हवी.”
https://twitter.com/mnsadhikrut/status/1656918072974880769?s=20
MNS Chief Raj Thackeray on Supreme Court Verdict