मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. राज्यपालांना पण कुणी स्क्रीप्ट देतं का? लक्ष वळवण्यासाठी दुसरीकडे. की , सरकारला काही गोष्टी विचारल्या जाऊ नयेत. यासाठी हे सगळे प्रयत्न असतात, अशी शंका राज ठाकरे यांनी व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.
राज म्हणले की, मी त्या माणसाबद्दल काय बोलावे ते कळतच नाही. ते अशा एका पदावर आहे की, ज्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही, असा कडक इशारा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिला. राज ठाकरे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. राज ठाकरे पुढे म्हणाले की, पदावरती बसतात पण कधी कुठली गोष्टी काय बोलावे याबद्दल कळत नाही. मागच्यावेळी ते जोतिबा फुले आणि महात्मा फुले यांच्याबद्दल बोलले होते. तुमचे सगळे लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत का? बऱ्याचदा महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे असे प्रकार केले जातात, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरही आपली भूमिका मांडली. माझा मध्यंतरी नागपूरचा दौरा झाला. माझा कोकणाचा दौरा संपला की पुढचा दौरा हा पश्चिम महाराष्ट्र असेल. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे असा दौरा असेल. आम्ही मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार, मी जाहीर केलं मी कुणासाठी काम करत नाही. मी माझ्या पक्षासाठी काम करतो, असेही राज ठाकरे म्हणाले.
MNS Chief Raj Thackeray on Governor Koshyari