मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भोंग्याच्या प्रश्नावरुन केवळ राज्यात नाही तर संपूर्ण देशातच खळबळ माजविणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आणखी एक गंभीर समस्येकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सध्या राज्यात वेठबिगारीच्या प्रश्न गाजत आहे, कारण मागील आठवड्यात एका आदिवासी कुटुंबाची वेठबिगारी सारख्या अमानुष प्रकारातून सामाजिक कार्यकर्त्यांनी सुटका केली आहे. या प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात लहान मुलांच्या वेठबिगारीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
विशेष म्हणजे राज ठाकरेंनी आज सोशल मीडियात एक पोस्ट लिहीली असून यात राज्यात नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार वाढत असल्याचे सांगत या गंभीर प्रश्नावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राज्यभरातील वेगवेगळ्या समाजातील आणि वर्गातील नागरिकांच्या तक्रारी संदर्भात नेहमीच गर्दी दिसून येते तसेच त्या संदर्भात राज ठाकरे देखील नेहमीच त्या त्या प्रश्री धारेवर धरत तत्कालीन सरकारला संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आवाहन करीत असतात.
सध्या देखील वेठबिगारीच्या प्रश्न राज ठाकरे यांनी शिंदे सरकारला असेच आवाहन केले आहे, इतकेच नव्हे तर आपल्या मनसे कार्यकर्त्यांना देखील राज ठाकरे यांनी या कामा संदर्भात काही सूचना दिल्या आहेत महाराष्ट्र सैनिकांनाही वेळ पडली तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना आपल्या पद्धतीने धडा शिकवण्याचे रोखठोक आदेश दिले आहेत.
मुंबईलगतच भिवंडी, ठाणे, कल्याण, पालघर, मुंब्रा, या ठिकाणी असलेल्या आदिवासींना गवत कापणे, बांधकाम, रेतीबंदर, आणि मिळेल ते काम करण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागते आहे. मात्र हे काम करीत असतांना बऱ्याचवेळा या आदिवासी मजुरांवर अन्याय सुद्धा होत असतो. पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील कातकरी समाज मुलभूत सुविधांपासूनही वंचित आहे.
या पीडित कुटूंबानी मतदानाचा अधिकार बजावलेला नाही, याला जबाबदार राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आहे आजही हजारो कातकरी बांधवांना रोजगारासाठी हिवाळ्यात तालुक्याबाहेर, जिल्ह्याबाहेर वीटभट्टी, बांधकामाच्या ठिकाणी किंवा मजुरीसाठी स्थलांतरित व्हावे लागते, हे जळजळीत वास्तव आजही कायम आहे. सरकारने अनेक योजना राबविल्या गेल्या परंतु कातकरी बांधवांचा विकास मात्र झालेला नाही.
रायगड, पालघर, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्य कातकरी समाजाची लोकसंख्या लक्षणीय दिसते. तसेच हाच समाज वेठबिगारीमध्ये अडकलेला आढळतो कारण या समाजातील अज्ञान होय, तसेच कुटुंबामधील आजारपण, लग्नकार्य तसेच घर बांधण्यासाठी आधीच मालकाकडून कर्ज म्हणून पैसे उचल घेतल्याने त्याला वेठबिगारीचे जीवन जगावे लागते.
इतकेच नव्हे तर त्यांच्या लहान मुलांना शिक्षण मिळत नाही, तर त्यांनाही सक्तीने कामाला लावले जाते, याच लहान मुलांच्या वेठबिगारीकडेच राज ठाकरे यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहेत आणि तातडीने कारवाई करण्याचे मागणी केली आहे. गेल्या काही काळापासून राज्य सरकारने महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. त्याचवेळी पुन्हा एकदा नवीन पोस्ट तयार करून सोशल मीडियावर टाकली आहे, ही पोस्ट राज्यातील वेठबिगारी प्रश्नसंदर्भात असून राज्य सरकारला या प्रकरणी तातडीने पावले उचलण्याची उचलण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीच उच्चाटन झाले असले तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात या घटना आढळणे हे राज्याला शोभणारे नाही. राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवे.
एकूणच जागृत समाजाने या प्रश्री पण पुढे यायला हवे. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील, असेही राज ठाकरे यांनी या संदर्भातील पत्रात म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत.
वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं. pic.twitter.com/sMxyOy4dzS— Raj Thackeray (@RajThackeray) September 23, 2022
MNS Chief Raj Thackeray New Issue Government Threat
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/