नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या खासगी दौऱ्यासाठी नाशिकला येणार आहेत. शनिवार आणि रविवार (१ व २ ऑक्टोबर) असा त्यांचा दौरा आहे. विशेष म्हणजे, दरवेळी मुंबईहून कारने नाशिकला येणारे राज हे प्रथमच विमानाने नाशिकला येणार आणि नाशिकहून मुंबईला विमानानेच परत जाणार आहेत.
शनिवारी १ ऑक्टोंबरला सकाळी ८.३० वा शिर्डी विमानतळावर खासगी विमानाने राज यांचे आगमन होणार आहे. शिर्डी येथे नाशिक येथील मनसे पदाधिकारी त्यांचे स्वागत करणार आहे. येथे श्री साई बाबा समाधी दर्शन घेऊन ते परत विमानाने ओझर विमानतळावर दुपारी ११.३० वाजता येणार आहे. येथे शहर अध्यक्ष व पदाधिकारी, विद्यार्थी सेना व महिला पदाधिकारी स्वागत करणार आहे. त्यानंतर ते ओझर विमानतळाहून नाशिक येथे एसएसके हॉटेल येथे येणार आहे. येथे रात्री मुक्काम करुन ते रविवार २ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८.३० वा श्री सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेऊन परत ओझर विमानतळ येथून रवाना होणार आहे. हा संपूर्ण दौरा हा खासगी असल्याची माहिती मनसे नेते पराग शिंत्रें यांनी दिली आहे.
MNS Chief Raj Thackeray Nashik Two Day Visit