मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. राज यांनी एक शुभेच्छा संदेश दिला आहे. त्यात म्हटले आहे की, एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका. पुन्हा एकदा आपले अभिनंदन
https://twitter.com/RajThackeray/status/1542519365203279872?s=20&t=EoMv8w0zYW47UF0cW1r2Lg
MNS Chief Raj Thackeray blessing to CM Eknath Shinde