ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज बुधवारी म्हणजेच १४ जून रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या या ५५ व्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली. संपूर्ण राज्यात कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी होर्डिंग लावण्यात येत आहेत. तर काही होर्डिंगसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मागच्या वर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव असल्यामुळे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यंदाचा राज ठाकरेंचा वाढदिवस महत्वाचा ठरत आहे. विशेष म्हणजे काही कार्यकर्त्यांनी काल रात्रीच त्यांच्या घराजवळ जल्लोष सुरू केला होता , पण राज म्हणाले की, आवाज करू नका, आरडाओरडा करू नका कारण माझा नातू आजारी असून तो झोपला आहे.
अशा स्विकारल्या शुभेच्छा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी राज्यभरातून कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. यादिवशी त्यांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी असते. प्रत्येकाला भेटता यावे, याकरता राज ठाकरे यादिवशी खास वेळ बाजूला काढून ठेवतात. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दिलेल्या भेटीच्या वेळेत ते भेटत असतात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून राज ठाकरेंना मिठाई, पुष्पगुच्छसारखे असंख्य भेटी येतात. यावरून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात -‘ माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावेसे वाटत असेल तर येताना झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही माझ्या या विनंतीचा नक्की मान ठेवाल याची मला खात्री आहे, ‘ असेही ते पुढे म्हणाले.
कार्यकर्त्यांना फटकारले….
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंगळवारी (१३ जून) रात्री शिवतीर्थावर केक घेऊन पोहचले. तेथे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या नावाने घोषणा सुरू केल्या. मात्र, राज ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांना फटकारले. आवाज करू नका, जास्ती आरडाओरडा करू नका… माझा नातू आजारी आहे आणि तो झोपला आहे, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. राज ठाकरे यांनी ही माहिती दिल्यानंतर कार्यकर्ते सुद्धा शांत झाले. याबाबतचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यंदा राज ठाकरे यांचा जंगी वाढदिवस साजरा करण्यासाठी मनसैनिकांनी चांगलीच तयारी केली आहे. ठिकठिकाणी बॅनर्स लावत कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी काही ठिकाणी लावलेले होर्डिंग चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, नवी मुंबईमधील मनसेचे नेते गजानन काळे यांनी राज ठाकरेंचा उल्लेख ‘जतनेच्या मनातील मुख्यमंत्री’ असा केलेले हॉर्डिंग लावले आहेत. या होर्डिंगची सध्या मुंबईमध्ये चर्चा असल्याचे दिसून येत आहे.
MNS Chief Raj Thackeray Birthday Wishes