नाशिक – नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षी पाणी कपात केली जाणार नसून मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले आहे. नाशिक शहरात महानगरपालिकेच्या वतीने गंगापूर,गौतमी व कश्यपी या समूह धरणांमधून शहरात पाणीपुरवठा केला जात असतो सध्याची गंगापूर धरणातील पाण्याच्या साठ्याची माहिती घेऊन पाणी कपातीबाबतच्या निर्णयाच्या दृष्टीने गंगापूर धरणातील पाण्याच्या साठ्याची पाहणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले. त्यांच्यासोबत सभागृहनेते सतीश सोनवणे,अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता एस एम चव्हाणके, अविनाश धनाईत,पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी केली.यावेळी धरणातील पाण्याचा साठा गंगापूर धरणात समूह धरणांमधून जमा होणारे पाणी याबाबतची सविस्तर माहिती महापौरांनी घेतली. तसेच सध्याचा पाणीसाठा उपलब्ध असणारा पाणीसाठा व असणारी आवश्यकता याची सविस्तर माहिती यावेळी घेण्यात आली. धरणात सध्याच्या परिस्थितीत ४७ टक्के इतका पाणी साठा असून तो साठा पुरेसा असल्याने नाशिक शहरात सध्याच्या परिस्थितीला पाणी कपात केली जाणार नसून मात्र शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मा.महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी पाहणीच्या सांगितले.