मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यसभा निवडणुकीत मतांची फोडाफोडी केल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत देखील भाजपने सत्ताधारी पक्षांची मते आपल्याकडे खेचून आणली. सहाजिकच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यापेक्षा राजकीय खेळी मध्ये यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच ही मतांची फोडाफोडी होत असल्याचे दिसून येते. विधान परिषद निवडणुकीत नक्की कुणाची मते फुटली, भाजपला सर्वाधिक फायदा झाला असला तरी सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची स्थिती काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.
महाविकास आघाडीतील मते फोडत विधानपरिषदेवर भाजपने आपले पाचही उमेदवार निवडून आणले. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाची तीन तर सहयोगी अपक्षांची एकूण १२ मते फुटली. काँग्रेसची २ मत फुटल्याने त्यांच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये भाजपला जादाची २७ मते मिळाली. त्यात देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीमुळे भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले. तर दुसरीकडे शिवसेना पक्षाची तीन मते फुटली, तर काँग्रेस व राष्ट्रवादीची एकूण १२ मते फुटली. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला १२३ मते मिळाली होती.
आता या निवडणुकीमध्ये त्यांना १३४ मते मिळाली होती. त्यामुळे भाजपला अतिरिक्त २७ मते मिळाली आणि त्यांचा ५ वा देखील उमेदवार निवडून आला. याउलट काँग्रेसची २ मते फुटल्याने चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे काँग्रेसची पहिल्या पसंतीची मते हंडोरे यांना द्यायचं ठरलं असतानाही त्यांना पहिल्या फेरीत विजयी होता आले नाही. पहिल्या फेरीत त्यांना केवळ २२ मते मिळाली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांची मते पडून भाजपचे पाचही उमेदवार विजयी ठरले.
mlc election voting counting figures politics bjp shivsena congress ncp