नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर नांदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत. कांदे यांनी आज दुपारी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. जिल्हा नियोजन समितीचा निधी कसा पळविला जात आहे, भुजबळ यांची राजकीय व अन्य पार्श्वभूमी कशी आहे यासह अशा अनेक बाबतीत त्यांनी गंभीर आरोप केल्याने हा वाद आता पेटणार असल्याचे दिसून येत आहे. भुजबळ यांचे पालकमंत्री पद काढून घेण्यात यावे, अशी मागणी कांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. कांदे यांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी खालील व्हिडिओ बघा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=178710537641172&id=103446941470343