अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागल्याने मनमाड येथील मालेगाव चौफुली येथे असलेल्या शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या कार्यालया समोर फटाक्यांची आतिषबाजी करत ढोलताशांच्या तालावर ठेका घेत, पेढे वाटप करत घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला …हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो आनंद दिघे साहेबांचा विजय असो एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो तसेच आमदार सुहास अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी महिलासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आनंदोत्साहात सहभागी झाले होते.