नाशिक – पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांच्यामधील वाद पुन्हा पेटला आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी वर्ग करु नये असे सांगत त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले. त्यात पोलिसात तक्रार करुन आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी काल थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे भुजबळांविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे पुढील काळात हा संघर्ष अजून पेटणार आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खा.संजय राऊत हे नाशिक दौ-यावर आले होते. त्यानंतर हा वाद काहीसा कमी होईल असे वाटत असतांना आ.कांदे यांनी पुन्हा भुजबळांविरोधात दंड थोपटले आहे. जिल्हाधिकारी दिलेले हे आहे पत्र