नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मी अपक्ष आहे अपक्षच राहणार असल्याची भूमिका मांडली. मला निवडणुकीत अनेक संस्था व संघटनेने पाठींबा दिला. त्यामुळे अपक्ष राहिल, जे सरकार असेल त्यांची मदत घेईल. सर्वांचे मार्गदर्शन मी पुढे घेईल असे सांगितले. यावेळी त्यांनी मला उमेदवारी मिळू नये यासाठी स्क्रिप्टेड स्टोरी होती. बाळासाहेब थोरात यांना कसे अडचणीत आणला येईल यासाठी षडयंत्र केले गेले. मला काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला गेल्याचाही आऱोप त्यांनी केला.
यावेळी आमदार तांबे पुढे म्हणाले की, निवडणुकी दरम्यान अनेक आरोप – प्रत्यरोप आमच्या परिवारावर झाले. आमच्या परिवाराला २०३० साली १०० वर्षे पूर्ण होत आहे. मी विद्यार्थी चळवळीतून राजकारणाला सुरुवात केली. तेथून कामाला सुरुवात केली. १० वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये आलो. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. येथे अंत्यत प्रामाणिकपणे काम केले. मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. युवक काँग्रेसचे पद गेल्यानंतर त्याला इतर संधी देण्याचे काम आतापर्यंत केले जाते. त्यासाठी मी पक्षश्रेष्ठीकडे जायचो तेव्हा वडील आमदार आहे. त्यामुळे पद देता येणार नसल्याचे सांगितले जात होते. यावेळी मी संघटनेत पद द्या असे मी वारंवार सांगत होचो. त्यानंतर मला वडीलांच्या जागेवर निवडणूक लढवा असे सांगितले. यावेळी माझी मानसिकता नसल्याचे मी सांगितले.
तांबे पुढे म्हणाले की, पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अनेक राजकीय क्षेत्रातील प्रमुख लोकांना बोलावले. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री फडणीस यांनी सत्यजितला संधी द्या नाहीतर आमचा डोळा असल्याची भावना बोलून दाखविली. त्यामुळे विषय चर्चेचा आला. मला कोठून संधी मिळत नसल्यामुळे वडीलांनी ही निवडणूक तू लढ असे सांगितले. मला वडीलांच्या जागेवर उभे राहयचे असे माझे मत नव्हते. त्यानंतर घरात चर्चा केली. त्यानंतर शेवटच्या क्षणात निर्णय घेऊ असे सांगितले. त्यानंतर एस. के. पाटील यांच्या बरोबरच चर्चा झाल्यानंतर कोरा फॅार्म पाठवून देण्याचे सांगण्यात आले. पण, नंतर फॅार्म देतांना एबीफॅार्म सीलबंद पाकीटात देण्यात आले. ११ तारखेला सकाळी ते पोहचले. फॅार्म भरतांना जेव्हा सीलबंद पाकीट फोडले तेव्हा औरंगाबाद व शिक्षक मतदार संघाचे फॅार्म देण्यात आल्याचे लक्षात आले. माझ्यावर अनेक आरोप झाले होते. पण, एकदाही पक्षातर्फे चुकीचे फॅार्म दिले हे सांगितले नाही. त्यानंतर फॅार्म आले येथे डॅा. सुधीर तांबे यांचे नाव होते. दुस-या क्रमांकाच्या उमेदवाराचे नाव नव्हते. आमच्या परिवाराला हेतुपुरुस्कर बदनाम करण्यासाठी हे गेले केले. त्याची स्क्रिप्ट अगोदर तयार करण्यात आली होती. हे एक षडयंत्र होते. आमच्या परिवाराला बदनाम करण्याचा हा हेतू होता.
या पत्रकार परिषदेत आमदार तांबे म्हणाले की, निवडणुकीत चुकीचे एबीफॅार्म देऊन आमच्या परिवाराला हेतुपुरस्कर बदनाम करण्यासाठी हे गेले केले. त्याची स्क्रिप्ट अगोदर तयार करण्यात आली होती. हे एक षडयंत्र होते. आमच्या परिवाराला बदनाम करण्याचा हा हेतू होता. मी काँग्रेसपक्षातर्फेच फॅार्म भरला होता. पण, एबी फॅार्म न आल्यामुळे मी अपक्ष राहिलो. २५ दिवस अर्धसत्य चालू होते. त्यामुळे हे मांडण्याचे काम मी केले. मी अपक्ष राहिल्यानंतर मी महाविकास आघाडीचा पाठींबा मागण्यासाठी सर्व घटक पक्षांकडे गेलो. त्यानंतर दिल्लीतून पक्षातर्फे जाहीर माफी मागण्याचे सांगितले गेले. चुक नसतांनाही मी तयार झालो. पत्रही दिले. पण, दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तांबे यांनी फसवल्याचा आऱोप करत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
MLA Satyajit Tambe Press Conference Serious Allegation