नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या अर्थसंकल्पीय अधिवेशान अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन गेल्या. येथे हिरकणी कक्षाची अवस्था पाहून त्यांचे अश्रू अनावर झाले. या कक्षामध्ये सोयी सुविधा नसल्याने त्यांनी विधीमंडळातून काढता पाय घेतला. नागपूरच्या हिवाळी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. पण, यावेळी या कक्षाकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
या कक्षाची अवस्था पाहून आमदार सरोज आहिरे म्हणाल्या, हिरकणी कक्षाबाबत सचिवांना पत्र दिले होते. पण, तरी त्याची योग्य दखल घेतली नाही. या कक्षामध्ये प्रचंड धूळ होती, कक्षातील सोफे फाटलेले आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी बाळाला कसे ठेवणार ? असा प्रश्नही त्यांनी केला. यावेळी त्या म्हणाल्या की येथे शौचालयाची देखील व्यवस्था करण्यात आलेली नाही. जर यात आज बदल केले नाहीत तर मला पुन्हा मतदारसंघात जावे लागेल. माझ्या लहान मुलाची तब्येत ठीक नसतानाही माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी मी आले. पण, हिरकणी कक्षाची अवस्था पाहून मला जावे लागत आहे.