इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – कर्नाटकात सत्तेवर येताच मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या सरकारने महिलांसाठी मोफत बस सेवा म्हणजेच ‘शक्ती योजना’ सुरु केली. या उद्घाटनप्रसंगी काँग्रेस महिला आमदार रूपकाला यांनी महिलांमध्ये मोफत बस पास वाटले. इतकेच नव्हे तर त्यांनी चक्क ड्रायव्हर सीटवर बसून बस चालवणार असल्याचे सुद्धा जाहीरपणे सांगितले. दरम्यान या सगळ्या प्रकारात त्यांच्याकडून एक चूक घडलीच आणि अपघात होऊन काही गाड्याचे नुकसान झाले.
व्हिडीओ व्हायरल…
सदर घटनेचा एक व्हिडीओ सध्या समोर येत असून त्यामध्ये आमदार रूपकला या ड्रायव्हरच्या मदतीने बस चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, यावेळी बसमध्ये अनेक महिला प्रवासी सुद्धा बसलेल्या आहेत. जेव्हा बस चालवण्याची वेळ येते तेव्हा रूपकला यांनी चुकून रिव्हर्स गिअर टाकला आणि यामुळे बसच्या मागे उभ्या अनेक गाड्या कोलमडून पडल्या. यानंतर मग ड्रायव्हरने स्वतः स्टेअरिंग हातात घेतले.सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. आमदारांनी सरकार चालवावे, बस चालविण्याचा प्रयत्न करू नये असे आता काही जण म्हणत आहेत
महिला व विद्यार्थिनींना फायदा
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने पाच गोष्टींपैकी एक असलेली ‘शक्ती’ योजना लागू केल्यानंतर महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. या मोफत प्रवास सुविधेचा ४१ लाखांहून अधिक महिलांना फायदा होईल आणि वार्षिक ४ हजार कोटी रुपये खर्च होतील. राज्यातील महिलांसाठी ही योजना राज्याच्या हद्दीत लागू झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या योजनेचा शुभारंभ केला, याचा महिला आणि विद्यार्थिनींना फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी या कार्यक्रमाला उपस्थित होते, यावेळी शक्ती योजनेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले आणि पाच महिलांना प्रतिकात्मकपणे शक्ती स्मार्ट कार्ड देण्यात आले.
MLA Roopkala Bus Driving Vehicle Damage