पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि बारामती अॅग्रो कंपनीचे सीईओ रोहित पवार आणि त्यांच्या पत्नी कुंती यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने रोहित पवार यांनी पत्नी कुंती यांना अनोख्या पद्धतीने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे
रोहित पवार यांनी म्हटले आहे की, पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर अनेक नात्यांना न्याय देणारी, प्रत्येकाच्या स्वभावाशी जुळवून घेणारी, आवडीनिवडी जपणारी, सर्वच जबाबदाऱ्या लिलया सांभाळणारी आणि खऱ्या अर्थाने माझं आयुष्य #बेटर करणारी #My_Better_Half सौ. कुंतीस लग्नाच्या तपपूर्ती वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!
रोहित पवार यांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://twitter.com/RRPSpeaks/status/1663023070817456128?s=20
MLA Rohit Pawar Wedding Anniversary Wishes Video