इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी कर्जतच्या लकी हॉटेलमधून पैसे वाटप केले जात असल्याची माहिती आमच्याकडून दुपारी २ वाजता प्रशासनाला देऊनही प्रशासनाने त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि तब्बल दोन तासांनी ४ वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्तात पैसे वाटप करताना आमच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला रंगेहात पकडल्याची माहिती सोशल मीडियात व्हिडिओ पोस्ट करत आमदार रोहित पवार यांनी दिली.
त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पैसे वाटप करणारी व्यक्ती ही मंगळवेढा येथील असून राम शिंदे यांचा नातेवाईक (अजून खोलात गेल्यास खूप काही पुढं येईल.) असल्याचं सांगत आहे. त्याच्याकडं ५ ते ८ लाख रुपये रोख रकमेसह लाखो रुपयांच्या याद्याही सापडल्या असून हा सर्व ऐवज पोलिसांकडं दिला आहे. याबाबत प्रशासन काय कारवाई करतं याकडं आमचं बारकाईने लक्ष आहे.
यावरुन आमदार राम शिंदे यांचा अवतार म्हणजे, ‘मी नाही त्यातला अन् पैसा बदाबदा ओतला…’ असाच म्हणावा लागेल.