ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना एकाने ७ कोटी ६६ लाख रुपयाला गंडा घातला आहे. या फसवणूक प्रकरणी आ. सरनाईक यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर काशीमीरा पोलिसांनी मालाडमधील मार्टिन अॅलेक्स बर्नार्ड कोरिया या आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जमीन खरेदीचे हे प्रकरण २०२१ या सालातील आहे. जमिनीचा व्यवहार पूर्ण न करता पैसेही परत दिले नसल्याचा सरनाईक यांनी आरोप केला आहे. घोडबंदर रोडवरील एक जमीन सरनाईक यांना घ्यायची होती. या जमिनीच्या व्यवहारासाठी आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल ७ कोटी ६६ लाख रुपये दिले आहे.
सरनाईक यांनी मार्टिन अॅलेक्स बर्नार्ड कोरिया यांना जमिनीचा व्यवहार करण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी साडे तीन कोटी रुपये दिले. बँकेचा व्यवहारही झाला होता. मात्र, एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतरही मार्टिनने घोडबंदर रोडवरच्या जमिनीचे पेपर सरनाईक यांच्या नावावर केले नाहीत. सरनाईक यांना पैसेही दिले नाही. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.