नाशिक – सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या व जिल्हा परिषदेच्या सदस्या सिमंतीनी कोकाटे यांचा विवाह सिध्दार्थ वानखेडे यांच्याबरोबर नोंदणी पध्दतीने आज दुपारी एक वाजता नाशिकच्या पंडीत कॉलनीतील महापालिका कार्यालयात होत आहे. कोरोनामुळे या नोंदणी स्वरूपातील विवाह सोहळ्यास फक्त त्यांच्या कुटूंबातील मोजकी लोकं यावेळी उपस्थित राहणार आहे. यावेळी त्याच ठीकाणी गोदावरी बँके समोरील लायन्स गार्डनमध्ये सिमंतीनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहे. यावेळी खा. सुप्रिया सुळे त्यांच्या समवेत असतील व त्याही या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्या संदर्भात पत्रकारांशी बोलणार आहे.
या नोंदणी सोहळ्यानंतर स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले असून येथेही कुटुंबिय व मोजकेच मान्यवर उपस्थितीत राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मंत्री या स्वागत सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहे.