नाशिक – शहरात सध्या रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम सुरू असून सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देण्यात आले यावेळी रस्त्याचे खड्डे भरण्याच्या कामाची चौकशी करण्यात येऊन ठेकेदारास काढायचे टाकण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. नाशिक शहरात पावसाळ्यामुळे रस्त्यांना अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून ते खड्डे भरण्याचे काम नाशिक महानगरपालिकेच्या ठेकेदारामार्फत केले जात आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असले बाबत तक्रार आमदार देवयानी फरांदे यांनी आयुक्त कैलास जाधव यांना केली.
याबाबत निवेदनात रस्त्यावरील खड्डे भरल्यानंतर दोनच दिवसात पुन्हा रस्त्याला खड्डे पडत असून त्यामुळे खड्ड्यातील मुरूम रस्त्यावर पसरून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याबाबत ही आमदार देवयानी फरांदे यांनी निवेदनात उल्लेख केला. ठेकेदार व नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यात संगनमताने सदर काम निकृष्ट दर्जाचे सुरू या कामांचा उद्देश केवळ ठेकेदाराचा आर्थिक फायदा करून देणे असल्याचे मत आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केले. त्यामुळे या सर्व रस्त्यांची पाहणी आयुक्त कैलास जाधव यांनी स्वतः करून कामाच्या दर्जाबाबत चौकशी करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. तसेच चौकशीअंती दोषी ठेकेदारांचा ना काळजी टाकण्याची मागणी देखील आमदार देवयानी फरांदे यांनी केली. जो पर्यंत आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून कामाची पाहणी होत नाही. तोपर्यंत ठेकेदारांना बिल अदा करू नये अशी विनंती देखील आमदार देवयानी फरांदे यांनी केली