इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ईशान्येतील मिझोराममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. ऐझॉलमध्ये बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. ही घटना सायरंग परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत मृतांचा आखडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी परिसरात ३५-४० लोक तेथे होते. हे सर्व लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ऐजॉलपासून २१ किमी अंतरावर घडली. आतापर्यंत सर्व मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर आणखी काही जणांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईशान्य फ्रंटियर रेल्वेचे सीपीआरओ सब्यसाची यांनी सांगितले की, रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
मिझोराममध्ये आज सकाळी एक वेदनादायक दुर्घटना घडली. सायरंग परिसरात बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी आणखी अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण राजधानी ऐजॉलपासून २१ किमी अंतरावर आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी सर्व मजूर पुलावर काम करत होते. कुरुंग नदीवर बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या रेल्वे पुलाचे काम सुरू होते.
बुधवारी सकाळी हा अपघात झाला तेव्हा सुमारे ४० कामगार उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अपघातस्थळी आणखी अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस अधिकाऱ्याने १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ढिगाऱ्यातून आतापर्यंत १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. इतर अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत.
मिझोरमचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुटलेला पूल दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, या घटनेमुळे मी खूप दुःखी आणि प्रभावित झालो आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी इच्छा व्यक्त करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर पोस्ट मध्ये म्हटले आहे की मिझोराममधील पूल दुर्घटनेमुळे मी दु:खी आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासाठी शोक. जखमी लवकर बरे होवोत. बचावकार्य सुरू असून बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Mizoram Railway Construction Bridge Collapse 17 Death