मिश्र रत्न अंगठी किंवा पेंडंट वापरायचंय? हे वाचा
बरेचदा आपण विविध प्रकारची रत्न एकत्र अंगठी मध्ये अथवा पेंडंट करून वापरतो, परंतु रत्न ज्योतिष शास्त्र प्रमाणे विरोधी तत्त्वाची रत्न एकत्र वापरू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. त्याबाबतची माहिती पुढील प्रमाणे…
आपल्या कुंडलीतील केंद्रातील घरे, त्यातील ग्रह व राशी, त्याचप्रमाणे पंचमेश नवमेश यामध्ये असलेले ग्रह, त्यांच्या ग्रह युती, त्यांच्यावर असलेल्या शुभ वा अशुभ ग्रहांच्या दृष्टी, कुंडलीत बनणारे विविध प्रकारचे योग याचा अंदाज, त्याचप्रमाणे हस्तरेषा यांचा आधार घेतला जातो.
हातावरील कोणत्या ग्रहाच्या उंचवट्यावर कोणत्या प्रकारच्या रेषा व चिन्हे आहेत, त्यानुसार आपण कोणत्या प्रकारचे, त्याचप्रमाणे किती कॅरेटचे रत्न, कोणत्या धातु मध्ये वापरावे, याचा अंदाज केला जातो.
परंतु बरेचदा एकाच वेळी विविध प्रकारचे मिश्र रत्न अंगठी अथवा पेंडंट धारण केलेली पहावयास मिळतात. मात्र, विरोधी तत्त्वाची रत्न एकत्र वापरू नये. त्यामध्ये रवी ग्रहाचा माणिक, गुरु ग्रहाचा पुष्कराज, मंगळ ग्रहाचे पोवळे, चंद्र साठी मोती हे सर्व ग्रह व रत्न शुभ तसेच सम तत्वाचे आहेत. त्यांची रत्ने तज्ज्ञांनी सांगितलेल्या कॅरेट प्रमाणे एकत्र अंगठीत अथवा पेंडंट मध्ये वापरावीत.
त्याचप्रमाणे शुक्रासाठी हिरा, राहूसाठी गोमेद, केतूसाठी लसण्या, शनीसाठी नीलम, बुधसाठी पन्ना हे ग्रह व रत्ने विषम तत्वाची असल्याने तीच एका गटात वापरावे.
थोडक्यात माणिक पुष्कराज, पोवळे व मोती हे एका गटातील ग्रहांशी संबंधित रत्ने आहेत.
नीलम, गोमेद, लसण्या, पाचू, पन्ना ही वेगळ्या ग्रह गटातील रत्ने आहेत.
त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मिश्र रत्न अंगठी अथवा पेंडंट वापरू नये…