नाशिक – नागरिकांची लसीकरणापूर्वी अँटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी होऊन त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून त्यांना आवश्यक सल्ला व उपचार उपलब्ध करून देणे व निगेटिव्ह व्यक्तींचेच लसीकरण व्हावे या संकल्पने द्वारे मिशन झिरो व मिशन लसीकरण हे अभियान नाशिक महानगर पालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व नाशिक वॉरियर्स या संस्थां द्वारे पंचवटी, नाशिक रोड, नाशिक पश्चिम विभागात सुरु करण्यात आले आहे. या मिशनधून ८ दिवसात ४७४४ अँटीजेन चाचण्या होऊन ७४ पॉझिटिव्ह रुग्णांना शोधण्यात यश आले. तर ४६७० निगेटिव्ह रुग्णांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. आज ८ व्या दिवशी एकूण ४८३ अँटीजेन चाचण्या होऊन २३ पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात यश आले.
लवकरच नाशिकच्या सहा ही विभागातील सर्व ३० लसीकरण केंद्रां जवळ महानगर पालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी, नाशिक वॉरियर्स या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मिशन झिरो हे अभियान सुरु होणार आहे. या ठिकाणी लसीकरणा व्यतिरिक्त ही नागरिक येऊन अँटीजेन चाचणी करून घेऊ शकतात व त्या योगे मनातील भीती दूर होण्यास मदतच होईल व आवश्यकता असल्यास सल्ला व उपचार घेऊ शकतात त्या मुळे पुढील संक्रमण रोखण्यास हातभार लागेल.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी महापौर सतीश नाना कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव, उपमहापौर भिकुभाई बागुल, स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते यांचे सह म न पा चे पदाधिकारी, नगरसेवक, आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंके, कोरोना नोडल अधिकारी डॉ विजय देवकर, डाॅ जितेंद्र धनेश्वर, डॉ चारुदत्त जगताप, डॉ. कल्याणी होळकर, आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबरीने मिशन झिरो व मिशन लसीकरण मोहिमेचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, नाशिक वॉरियर्सचे नरेंद्र गोलिया, गोपाल अटल, रामेश्वर मालानी, राजा जॉली, विनोद गणेरीवाल, ओम रुंगठा, स्वामी समर्थ मंदिर रविवार पेठ चे अॅड राजेंद्र लोढा,बी जे एस चे ललित सुराणा, अभय ब्रम्हेचा, अमित बोरा, गोटू चोरडिया, गौतम हिरन, रवींद्र चोपडा, रोशन टाटीया, किरण धनराय हे परिश्रम घेत आहेत.