मिशन इयत्ता दहावीः परीक्षेचा ताण असा घालवा
इंडिया दर्पण आणि वेलकम दहावी आयोजित मिशन दहावी 2022 मार्गदर्शन मालिकेत परीक्षेपूर्वी येणाऱ्या ताणाची ऐशीतैशी कशी करावी? याचे मार्गदर्शन विजय गोळेसर (मो. 9422766227) यांनी या व्हिडिओत केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही परीक्षा महिना पंधरा दिवसांवर आली की अनेक विद्यार्थांना आणि त्यांच्या पालकांनाही टेंशन येतं. या ताणातून तणाव निर्माण होतो. विद्यार्थांना रात्रभर झोप येत नाही. जेवण जात नाही.रात्रभर जागरण झाल्यामुळे दिवसभर उत्साह राहात नाही. अभ्यास करण्याची इच्छा राहात नाही. आपण नापास झालो तर काय होईल या चिंतेने संपूर्ण स्वास्थ्य बिघडून जातं. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये विजय गोळेसर यांनी परीक्षेपूर्वी येणाऱ्या ताण तणावाला तोंड कसं द्यावं. विद्यार्थांचे स्वास्थ्य बिघडवणार्या ताण तणावावर प्रभावी मात कशी करावी आणि संपूर्ण आत्मविश्वासाने दहावीचे पेपर्स कसे लिहावेत याचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. (बघा, हा व्हिडिओ)