अवघड विषय सोपा कसा कराल?
दहावीची परीक्षा जवळ आली की, अनेक विद्यार्थांना धडकी भरते.विशेष म्हणजे नियमित अभ्यास करणारे विद्यार्थीही गांगरून जातात. अनेक विद्यार्थांना अवघड विषयांची भीती वाटू लागते.त्या विषयांचा अभ्यास करण्याची त्यांना इच्छाच होत नाही. खरं तर दहावीचा कोणताही विषय अवघड नसतो की सोप्पा नसतो. आपणच विषय अवघड किंवा सोप्पा बनवितो. मग आपणच अवघड बनविलेला विषय आपणच सोप्पा देखील बनवू शकतो. विजय गोळेसर (मो. 9422765227) यांनी या व्हिडिओत अवघड विषय सोप्पा कसा करता येतो याचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. तसेच अभ्यासाला खेळ समजून तो आनंदाने कसा करावा याचेही मार्गदर्शन या व्हिडिओत करण्यात आले आहे.