‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी 2022’ या विशेष मार्गदर्शन मालिकेत विजय गोळेसर (मो. 9422565227) यांनी विद्यार्थांनी परीक्षेच्या काळात काय खावं? कोणते खाद्य पदार्थ टाळावेत याचे मार्गदर्शन केले आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थांनी काय खावं कोणता आहार घ्यावा याचा पालकांना विशेषतः मातांना मोठाच प्रश्न पडतो.विद्यार्थांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी कोणता आहार घ्यावा तसेच कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे मार्गदर्शन विजय गोळेसर यांनी केले आहे. परीक्षेच्या काळात खूप जागरण देखील करू नये. अभ्यास लक्षांत राहण्यासाठी झोप घेण्याची आवश्यकता असते हे देखील या व्हिडिओत विजय गोळेसर यांनी समजावून सांगितले आहे. विद्यार्थांना आणि पालकांना हा व्हिडिओ निश्चित मार्गदर्शक ठरेल.