आत्मविश्वास वाढविण्यासाठी पेपर्स कसे सोडवावेत?
इंडिया दर्पण डॉट कॉम आणि वेलकम दहावी आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी’ या विशेष मार्गदर्शन मालिकेत या व्हिडिओत विजय गोळेसर (9422765227) यांनी दहावीच्या विद्यार्थांनी आत्मविश्वास वाढविण्यासाठी परीक्षेपूर्वी पेपर्स कसे सोडवावेत याचे मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थांनी आपण जणू बोर्डाचे पेपर लिहितोय असे समजून ठरलेल्या वेळेत पेपर लिहावेत. यामुळे आपलं काय चुकतय. कोणता भाग अधिक चांगला करावा? पेपर सोडविताना वेळेचे नियोजन कसे करावे याची कल्पना येते. पेपर्स ची भीती वाटत नाही. आणि परीक्षेला तोंड देण्यासाठी विद्यार्थी आत्मविश्वासाने तयार होतात. या व्हिडिओत विजय गोळेसर यांनी पेपर्स कसे लिहावेत याचे महत्त्व समजावून सांगितले आहे.