‘इंडिया दर्पण डॉट लाईव्ह कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ‘ मिशन इयत्ता दहावी 2022’ या विशेष मार्गदर्शन मालिकेतील या व्हिडिओत विजय गोळेसर (मो. 9422765227) यांनी परीक्षेपूर्वी अभ्यास लक्षात ठेवण्याची काही सोप्पी तंत्र किंवा सोप्पी युक्ती सांगितली आहे. परीक्षा जसजशी जवळ येऊ लागते तसे अनेक विद्यार्थांना आपण केलेला अभ्यास लक्षात राहतो की नाही याची शंका वाटू लागते. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो. लक्षांत ठेवण्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास करावा म्हणजे खात्रीशीर लक्षांत राहते याचे मार्गदर्शन या व्हिडिओत केले आहे. दहावीच्या विद्यार्थांना हे मार्गदर्शन निश्चित उपयुक्त ठरेल.