‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम आणि वेलकम दहावी आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी 2022’ या विशेष मार्गदर्शन लेखमालेत या व्हिडिओत विजय गोळेसर (मो. 9422765227) हे मार्गदर्शन करीत आहेत. ‘परीक्षा काळात स्वत:ला उत्साही कसे ठेवावे याचे मार्गदर्शन ते आज करीत आहेत. कोणत्याही परीक्षेची तयारी करतांना विद्यार्थ्यांनी उत्साही राहणे आवश्यक असते. परंतु बरेच विद्यार्थी केवळ परीक्षेची चिंता करतात. त्याऐवजी आपला वेळ अभ्यासात घालविला तर यश मिळू शकते. यासाठी स्वत:मध्ये उत्साह निर्माण करणे , स्वत:लाच प्रेरणा देणे आवश्यक असते. स्वत:ला हा उत्साह कसा द्यावा याचे मार्गदर्शन विजय गोळेसर यांनी या व्हिडिओत केले आहे. विद्यार्थांना हा व्हिडिओ अतिशय मार्गदर्शक आणि प्रेरणादायक ठरेल.