मिशन इयत्ता दहावीः परीक्षेपूर्वी आत्मविश्वास वाढवायचाय? फक्त हे करुन पहा
‘इंडिया दर्पण लाईव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’; आयोजित ‘ मिशन इयत्ता दहावी 2022’ मध्ये विजय गोळेसर (मो. 9422765227) यांनी परीक्षेपूर्वी १०-१५ दिवसांत विद्यार्थांनी आपला आत्मविश्वास कसा वाढवावा याचे मार्गदर्शन केले आहे. मिशन इयत्ता दहावी मध्ये विद्यार्थांनी परीक्षेपूर्वी नैसर्गिकपणे जो ताण किंवा टेंशन येते त्यावर नियंत्रण करून परीक्षेसाठी आत्मविश्वास कसा वाढवावा याचे सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओत केले आहे. आत्मविश्वास वाढविण्यासाठी दहा पंधरा दिवसांत घरच्या घरीच सर्व विषयांचे पेपर्स कसे सोडवावेत आणि झालेल्या चुका समजून घेऊन आपला अभ्यास परिपूर्ण कसा करावा याचे महत्त्व समजावून दिले आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थांना आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा व्हिडिओ निश्चित उपयुक्त ठरेल.