मिशन इयत्ता दहावीः पेपर दिल्यानंतर काय टाळावे
कोणतीही परीक्षा देण्यापूर्वी विद्यार्थांना परीक्षेचे टेन्शन किंवा ताण येतो परंतु पेपर लिहून व देऊन झाल्यावर विद्यार्थी टेंशन फ्री होतात अाणि झालेल्या पेपर विषयी चर्चा करतात. या चर्चेमुळे अनेक विद्यार्थांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग पुढच्या पेपरची तयारी करायला मूड रहात नाही. हे टाळण्यासाठी काय करावं याची माहिती ‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी 2022’ या विशेष मार्गदर्शन मालिकेत विजय गोळेसर (मोबाइल 9422765227) यांनी केले आहे. विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढविणारा हा व्हिडिओ विद्यार्थांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. विद्यार्थांनी हा व्हिडिओ अवश्य पहावा.