मिशन इयत्ता दहावीः पेपर वेळेत सोडविण्यासाठी सराव कसा करावा?
‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘वेलकम दहावी’ आयोजित ‘मिशन इयत्ता दहावी 2022’ या विशेष मार्गदर्शन मालिकेतील आजच्या मार्गदर्शनाचा विषय अाहे- परीक्षेचे पेपर्स वेळेत लिहिण्याचा सराव कसा करावा? कोणत्याही परीक्षेतील सर्वांत महत्त्वाचा भाग असतो परीक्षेचे पेपर्स लिहिणे किंवा सोडविणे. पेपर्स केवळ लिहूनच भागत नाही तर ते दिलेल्या वेळेतच लिहून होणे आवश्यक असते. यासाठी सरावाची किंवा पेपर्स सोडविण्याच्या प्रॅक्टिसची गरज असते. दहावीच्या विद्यार्थांना पेपर्स वेळेत सोडविण्याचे महत्त्व माहित आहे. परंतु हे पेपर्स दिलेल्या वेळेत कसे सोडवावेत. यासाठी बोर्डाने दिलेल्या ९ तासांचा सराव कसा करावा. पेपर्स लिहिण्याचा सराव घरी कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन विजय गोळेसर (मोबाइल 9422765227) यांनी या व्हिडिओत केले आहे. या व्हिडिओत दिलेल्या सूचनांचा अभ्यास करून विद्यार्थांनी परीक्षेपूर्वी पेपर्स सोडविण्याचा व वेळेत सर्व प्रश्न सोडविण्याचा सराव केल्यास त्यांना जास्तीत जास्त गुण निश्चित मिळू शकतील. बघा हा व्हिडिओ