अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव मधून वाहणा-या गिरणा नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्यात आला असून पुरामुळे त्यावरुन पाणी वाहत आहे. याच पुराच्या पाण्यात गिरणा नदी पुलावरुन किल्ला परिसरात राहणा-या नईम मोहम्मद अमीन या २३ वर्षीय तरुणाने उडी मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. उडी मारल्यानंतर मात्र या तरुणाचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही. याच केटीवेअर बंधा-यावर अनेक जण स्टंट बाजी होत असल्याच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. त्यामुळे पूर परिस्थितीत या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी होत आहे. सध्या कळवण,बागलाण तालूक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने तेथील धरणांमधून पाणी विसर्ग होत असल्याने गिरणा नदीला मोठा पूर आला आहे.