नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-आठव्या एमसीए अर्थात मिसाईल कम ऍम्युनिशन बार्ज, एलएसएएम 11(यार्ड 79) चे आज महाराष्ट्रात मिरा भाईंन्दर येथील मेसर्स सेकॉन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स प्रा. लि.विशाखापट्टणम् च्या जलावतरण स्थळी जलावतरण करण्यात आले.सीएमडीई एन गोपीनाथ एजीएम(पीएल), एनडी(एमबीआय) या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.विशाखापट्टणम येथील एमएसएमई शिपयार्ड, मेसर्स सेकॉन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत आठव्या मिसाइल कम ऍम्युनिशन बार्जेसच्या बांधणीसाठी 19 फेब्रुवारी 21 रोजी करार करण्यात आला होता.
भारतीय जहाज डिझाइनिंग फर्म आणि इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (IRS) यांच्या सहकार्याने या बार्जेसची रचना आणि बांधणी या शिपयार्डने स्वदेशी पद्धतीने केली आहे. समुद्रातील वापरयोग्यता सुनिश्चित करण्यासाठी विशाखापट्टणम येथील नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी (NSTL) येथे याची मॉडेल चाचणी घेण्यात आली.
या शिपयार्डने आतापर्यंत यापैकी सात बार्जचा यशस्वीरित्या पुरवठा केला आहे आणि भारतीय नौदलाकडून त्यांच्या परिचालनात्मक विकासासाठी जेट्टी आणि बाह्य बंदरांवर अशा भारतीय प्लॅटफॉर्मवर वस्तू/दारुगोळा वाहतूक, जहाजात चढवणे आणि उतरवणे सुलभ करून त्यांचा वापर केला जात आहे. हे बार्जेस भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांचे अभिमानास्पद ध्वजवाहक आहेत.