इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मिर्झापूरमध्ये ‘माधुरी भाभी’ची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ईशा तलवार हिचा नुकताच शूटिंगदरम्यान अपघात झाला. ‘सास बहू और फ्लेमिंगो’ हा तिचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रीकरणादरम्यान आपला एक अपघात झाल्याचे अभिनेत्रीने सांगितले असून यात तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
कसा झाला अपघात?
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये स्वतः ईशाने दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एक तिचा साधा फोटो आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तिचा एक डोळा पट्टीने झाकलेला पहायला मिळतोय. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर स्क्विब मशीनचा वापर करण्यात आला होता. हा एक ऍक्शन सीन होता, आणि त्या स्क्विब मशीनमुळेच इशाच्या डोळ्याला दुखापत झाली. “सेटवर खूपच अंधार होता त्यातच ही स्क्विब्स थेट माझ्या डोळ्याला लागली. त्यामुळेच माझा डोळा सुजला. आणि नंतर मला डोळे उघडायला फारच त्रास होत होता. सहकलाकार दीपक डोब्रियाल यांनी मला डॉक्टरकडे नेलं. त्यानंतरही तीन दिवस मी त्या डोळ्याची उघडझाप करू शकत नव्हते. त्यानंतर मी सेटवर परतले”, असं इशाने सांगितलं.
सीन स्वतःच चित्रित करण्याचा हट्ट
डोळ्याच्या दुखापतीनंतर डॉक्टरांनी तिला उजेडात जाण्यास सक्त मनाई केली. त्यामुळे तीन दिवस तिला अंधारातच राहावं लागलं. दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी इशाला ऍक्शन सीन्ससाठी बॉडी डबलचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. मात्र इशाने ते सीन्स स्वत: शूट करण्याचा आग्रह केला होता.
सास बहू और फ्लेमिंगो
‘सास बहू और फ्लेमिंगो’ हा चित्रपट ५ मे रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा सावित्री (डिंपल कपाडिया) आणि तिच्या सुनेभोवती फिरते. हस्तीपूर इथं राहणारी सावित्री ही बिजली आणि काजल या दोन सूनांसोबत आणि मुलगी शांतासोबत मिळून राणी को-ऑपरेटिव्ह चालवते. या चित्रपटात तिचे बरेच ऍक्शन सीन्स आहेत.
https://twitter.com/StarMaa/status/1658372726376243200?s=20
Mirzapu Fame Actress Isha Talwar Accident While Shooting