नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात अल्पवयीन मुली आणि महिला असुरक्षित असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात घडलेल्या तीन घटनांनी संपूर्ण देश हाजरला आहे. या तिन्ही घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर एका मुलीला डिझेल टाकून पेटवून देण्यात आले आहे. तसेच, गुन्हेगारांनी या घटनेचा व्हिडिओही समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अल्पवयीन मुली, तरुण मुली आणि महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये २४ तासांत दोन सामूहिक बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एका १६ वर्षीय दलित मुलीवर तिच्या घरात घुसून सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिला डिझेल ओतून पेटवून देण्यात आले. तिला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर, तिसऱ्या घटनेत बिहारमध्ये बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.
एका १६ वर्षीय दलित मुलीवर घरात घुसून सामूहिक बलात्कार करण्यात आला. या गुन्ह्याला वाचा फुटू नये म्हणून तिला डिझेल ओतून पेटवून दिले. तरुणीला जळालेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी २ जणांविरुद्ध सामूहिक बलात्कारासह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पीडित मुलीचा जबाबही नोंदविण्यात आला आहे.
पीडितेच्या वडिलांनी तक्रार दिली आहे की, गावातील दोन तरुण राजवीर आणि ताराचंद यांनी घरात घुसून त्यांच्या मुलीवर बलात्कार केला आणि डिझेल फवारून तिला पेटवून दिले. पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, माहिती मिळताच त्यांनी तत्काळ मुलीच्या गावात पोहोचून संपूर्ण प्रकरणाचा स्वत: तपास केला. नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजवीर आणि ताराचंद यांच्याविरुद्ध बलात्कार, खुनाचा प्रयत्न आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटकही केली.
दुसऱ्या प्रकरणात बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन दलित विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. जिथे गावात राहणाऱ्या दोन तरुणांनी तिला रात्री घरातून नेले आणि तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आपली मुलगी घरी नसल्याचे सकाळच्या सुमारास पीडित मुलीच्या आईला दिसले. तिने तिचा शोध सुरू केला असता मुलगी उसाच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसले. यानंतर कुटुंबियांनी तिला उचलून घरी आणले. पीडितेने घडलेला प्रकार पालकांना सांगितला आणि तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, मुख्य आरोपीच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे, इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल. २४ तासांत दोन सामूहिक बलात्काराच्या घटनेने उत्तर प्रदेशात मुलींच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
तिसऱ्या प्रकरणात बिहारच्या वैशाली जिल्ह्यात पाच युवकांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ व्हायरल केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. ही १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आणि शेजारच्या गावातील तिचा प्रियकर हे भेटण्यासाठी गावाच्या बाहेर पोहोचले होते. याचवेळी येथे पाच युवक दाखल झाले आणि या दोघांना पकडले. या मुलीवर तिच्या प्रियकरासमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आणि त्याचा व्हिडिओ आता व्हायरल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतल असून आरोपींचा कसून शोध सुरु आहे.
Minor Girl Gang Rape Crime Uttar Pradesh Bihar Police Investigation
Diesel Fire Burn Video Viral POSCO