इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वाहनांचे अपघात होणे ही जणू काही नित्याचीच गोष्ट झाली आहे, भारतात वाहन अपघातामुळे दररोज शेकडो नव्हे तर हजारो नागरिक मृत्युमुखी पडतात. तर लाखो लोक जखमी होतात. यासंदर्भात केंद्रीय रस्ते, महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देखील अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे. अनेक वेळा रस्त्यांवरील वाहन अपघातांना भारतातील विविध प्रांतातील रस्ते जास्त जबाबदार आहेत. तसेच वाहनांच्या मधील यांत्रिक- तांत्रिक बिघाड व त्याचप्रमाणे वाहनचालकाला बेजबाबदारपणा देखील तितकाच कारणीभूत ठरतो, असे दिसून येते. दोन वाहनांची समोरासमोर धडक होणे वाहन रस्त्याच्या कडेला उलटणे एक वाहन दुसऱ्याला धडकने भरधाव वेगाने वाहने जात असताना अपघात घडले असे प्रकार नेहमीच दिसतात. परंतु यातील भयानक प्रकार म्हणजे रस्त्यावरून जाणारे पादचारी किंवा रस्त्यानजिक उभे आणि बसलेले तसेच रात्री झोपलेले नागरिक यांना वाहनाने चिरडणे अत्यंत भयानक घटना म्हणावी लागेल. ही देखील एखाद्या मोठ्या शहरात घडली तर याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो, आणि तात्काळ ते वाहन देखील पेटवून देण्यात येते, असे प्रकार अनेक वेळा घडलेले आहेत.
तेलंगणा राज्यात देखील एका वाहनचालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून रस्त्यावरील महिलांना चिरडले विशेष म्हणजे हा वाहनचालक अल्पवयीन होता आणि त्याने रागाच्या भरात आपल्या वडिलांची कार चालवून हा अपघात घडला हे दुर्दैवच म्हणावे लागेल, त्यामुळे अल्पवयीन मुलांना वाहन चालवणे देणे किती धोकादायक ठरते हे दिसून येते. या संदर्भात पालकांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे असे म्हटले जाते. तेलंगणामध्ये एका अल्पवयीन मुलाने चार महिलांना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वास्तविक, अल्पवयीन व्यक्तीने फूटपाथवर बसलेल्या महिलांवर कार चालवली होती. करीमनगरचे सीपी व्ही सत्यनारायण यांनी सांगितले की, कारमधील अल्पवयीन मुलांविरुद्ध आयपीसीच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.