नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्यक्ष कर संकलनाची १० मार्च २०२३ पर्यंतची तात्पुरती आकडेवारी स्थिर वृद्धी नोंदवत आहे. १० मार्च २०२३ पर्यंत १६.६८ लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झाले असून जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील सकल कर संकलनापेक्षा २२.५८ टक्के अधिक आहे. परतावा वजा करता प्रत्यक्ष कर संकलन, १२.७३ लाख कोटी रुपये आहे जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ कर संकलनापेक्षा १६.७८ टक्के अधिक आहे. हे संकलन एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ९६.६७ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या प्रत्यक्ष करांच्या एकूण सुधारित अंदाजांच्या 83.19 टक्के आहे.
एकूण महसूल संकलनाच्या दृष्टीने, कॉर्पोरेट प्राप्तिकर (सीआयटी) आणि वैयक्तिक प्राप्तिकर (पीआयटी) यामधील वाढीचा दर लक्षात घेता, सीआयटीसाठी वाढीचा दर १८.०८% आहे तर पीआयटीसाठी (एसटीटी सह) २७.५७ टक्के आहे. परताव्याच्या समायोजनानंतर, कॉर्पोरेट प्राप्तिकर संकलनामधील निव्वळ वाढ १३,६२ टक्के आहे आणि वैयक्तिक प्राप्तिकर संकलनामधील २०.७३ टक्के (केवळ पीआयटी) / २०.०६ टक्के (एसटीटी सह पीआयटी) इतकी आहे.
१ एप्रिल २०२२ ते १० मार्च २०२३ या कालावधीत. २.९५ लाख कोटी रुपये परतावा जारी करण्यात आला आहे, जो मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यांच्या तुलनेत ५९.४४ टक्के अधिक आहे.